केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत नियमानुसार पुणे महानगरपालिकेने रस्त्यावर थुंकणार्‍या नागरिकांवर कारवाई सुरू केली असून आज तब्बल २४ थुंकी सम्राटांकडून रास्ता साफ करून घेण्यात आला. त्यांच्याकडून २६०० रुपये दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे तसेच प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत.

त्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर मागील काही दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी भवानी पेठ कार्यालयामार्फत तब्बल २४ थुंकी सम्राटांकडून २६०० रुपये दंड वसूल करण्यात आल. थुंकी सम्राटांकडून रस्ता देखील साफ करून घेण्यात आला. या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.