News Flash

मनसेच्या प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद कोर्टाकडून रद्द

जन्मतारखेचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.

| March 14, 2013 04:22 am

जन्मतारखेचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला. प्रिया गदादे या प्रभाग क्रमांक ५६ मधून मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. 
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक लढविताना त्यांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी होते. त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सादर केलेले जन्मतारखेचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला. प्रिया गदादे यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेतील संख्याबळ २८ इतके झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 4:22 am

Web Title: pune court cancelled corporater priya gadades membership
टॅग : Court
Next Stories
1 पुणे- नाशिक रेल्वेमार्ग ठरणार विकासमार्ग!
2 विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयांना जोडणार ‘पुनेक्स’
3 शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल नाहीत!
Just Now!
X