21 September 2020

News Flash

घरात शिरलेल्या चोरटय़ाकडून वृद्ध दाम्पत्याला मारहाण व लूट

केशव दत्तात्रय गोखले आणि त्यांच्या पत्नी या मारहाणीत जखमी झाले आहेत.

घरात शिरलेल्या एका चोरटय़ाने वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याच्या बांगडय़ा पळवून नेण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास पर्वती पायथा येथे घडला. या घटनेत हे दाम्पत्य जखमी झाले आहे. वृद्ध दाम्पत्याशी ओळख वाढवून आरोपीने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

केशव दत्तात्रय गोखले आणि त्यांच्या पत्नी या मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथील डेअरीवर गोखले यांची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. ओळख झाली त्या दिवशी त्याने दोघांना घरी सोडले होते. त्यानंतर त्याने गोखले दाम्पत्याशी मुद्दाम ओळख वाढविली. त्याने गोखले यांच्या घरी येऊन जेवण देखील केले होते. त्याच्या बोलण्यावर गोखले यांचा विश्वास बसला होता. त्यामुळे त्याबाबत दोघांनाही कोणताच संशय आला नाही.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास संबंधित व्यक्ती पुन्हा गोखले यांच्या घरी आला. कोणतेही कारण नसताना त्याने दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच त्याने गोखले यांच्या पत्नीच्या हातातील ६५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगडय़ा हिसकावून घेतल्या व पळ काढला. घटनेची माहिती मिळताच दत्तनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत असून, त्यावरून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. मोहिते पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:23 am

Web Title: pune crime 8
Next Stories
1 विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी ६० ज्ञानमंडळांची स्थापना
2 ‘पंतप्रधान रोजगार’मधून कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
3 पोलीस दाम्पत्याची एव्हरेस्ट मोहीम वादात
Just Now!
X