विवाहासाठी युवतीचा पिच्छा पुरवून तिला धमकावणाऱ्या एकाच्या विरोधात विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीनंतर वधू-वर सूचक मंडळाच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय कुडतरकर (रा. बुधवार पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका वधू-वर सूचक मंडळाच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडतरकर खानावळ तसेच वसतिगृहाचा चालक आहे.
दीड वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात कुडतरकरने एका युवतीला पाहिले होते. युवतीने एका वधू-वर सूचक मंडळात विवाहासाठी नोंदणी केली होती. कुडतरकरने युवतीबाबत माहिती काढली. वधू-वर सूचक मंडळाच्या संचालकांमार्फत युवतीच्या कुटुंबीयांशी त्याने संपर्क साधला आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवला. याच मुलीशी लग्न कर असे वधू-वर सूचक मंडळाच्या संचालकांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
युवतीच्या कुटुंबीयांनी कुडतरकरला नकार कळविला. त्यानंतर कुडतरकरने युवतीकडे विवाहाबाबत विचारणा केली. तिने नकार दिल्यानंतर कुडतरकरने युवतीचा पिच्छा पुरविला. युवती काम करत असलेल्या कार्यालयात कुडतरकर गेला. त्याने युवतीला धमकावले. त्याच्या त्रासामुळे युवतीने तिचा मोबाइल क्रमांक बंद केला. त्यानंतरही त्याने तिला त्रास देणे सुरु ठेवले. अखेर युवतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 7, 2019 11:30 am