News Flash

पुणे : ‘खतरनाक खिलाडी’ पाहून मित्राचे अपहरण करुन केला निर्घृण खून

आरोपीने 'खतरनाक खिलाडी २' हा चित्रपट पाहून मित्राच्या अपहरणाची योजना आखली होती.

(मयत छायाचित्र)

महागडी कार घेण्यासाठी मित्रानेच मित्राचे ४० लाख रुपयांसाठी अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘खतरनाक खिलाडी २’ पाहून यातून प्रेरणा घेऊन खून केल्याची कबुली आरोपीने भोसरी पोलिसांना दिली आहे. अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी – वय- १७ रा.दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून उमर नसीर शेख वय- २१ रा.खडकी असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमर नसीर शेख याने ‘खतरनाक खिलाडी २’ हा चित्रपट पाहिला. यातून प्रेरणा घेऊन मित्राचे अपहरण करत ४० लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार, रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुण्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा आवळून खून केला. दरम्यान, मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत अस सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती.

दरम्यान, आरोपी आणि मयत यांनी अनेकदा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये बिअर पार्टी केली होती, असं पोलिसांनी सांगितले. अवघ्या काही तासातच आरोपीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 11:15 am

Web Title: pune crime friend kills him after watching khatarnak khiladi 2 movie
Next Stories
1 उच्च शिक्षण संस्थांमध्ये ई सिगारेटला बंदी
2 राज्यातील ९६ हजार सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण
3 देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘मी पुन्हा येईन!
Just Now!
X