18 January 2019

News Flash

पुण्यात बसून पंधराशे अमेरिकी नागरिकांना गंडा..

खराडीतील कॉलसेंटरवर छापा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सायबर गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत; खराडीतील कॉलसेंटरवर छापा

आयफोन तसेच आयपॅडचा वापर करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना तांत्रिक बिघाड झाल्याचे संदेश पाठवून गंडविणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. खराडी भागातील एका इमारतीत सुरु असलेल्या कॉलसेंटरच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार सुरु होता. पोलिसांकडून तेथे छापा टाकून हार्डडिस्क, लॅपटॉप, राऊटर असा माल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पंधराशे अमिरेकी नागिरकांना साडेदहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी आदित्य काळे (वय २९,रा. बावधन) आणि रोहित माथूर (वय २९,रा. लोहगाव) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी काळे आणि माथूर उच्चशिक्षित आहेत. माथूर संगणक अभियंता आहे, तर काळेने परकीय उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दोघांनी भागीदारीत कॉलसेंटर सुरु केले होते. खराडीतील सिटी व्हिस्टा इमारतीत व्ही टेक सोल्युशन या कॉलसेंटरमधून आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या अमेरिकी नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त मििलद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

पोलीस निरीक्षक गजानन पवार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक सागर पानमंद, उपनिरीक्षक किरण औेटे, सोनाली फटांगरे, राजकुमार जाबा, प्रसाद पोतदार, अनिल पुंडलिक, संतोष जाधव, नितेश शेलार, शिरीष गावडे, शुभांगी मालुसरे, शीतल वानखेडे यांनी तेथे छापा टाकला. आरोपी काळे आणि माथूर यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी पंधराशे अमेरिकी नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

अशी केली जायची फसवणूक

आयफोन आणि आयपॅड वापरणाऱ्या अमेरिकी नागरिकांना आरोपी काळे आणि माथूर संदेश पाठवायचे. मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. हा बिघाड दूर केला जाईल. त्यासाठी अ‍ॅपल आयटय़ून कार्ड खरेदी करावे लागेल. या कार्डची किंमत १७५ डॉलर आहे. त्यानंतर आरोपी काळे आणि माथूर आयटय़ून कार्डचा क्रमांक त्यांच्या राजस्थानातील साथीदाराला पाठवित होते. या कार्ड खरेदी व्यवहारातून दोघांना काही टक्केवारी मिळत होती.

First Published on January 14, 2018 3:35 am

Web Title: pune crime news 25