News Flash

पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास विरोध केल्यानं महिलेनं ‘त्या’ पुरूषाच्या पत्नीला घेतला चावा

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

अनैतिक संबंध ठेवलेल्या पुरुषाच्या पत्नीला महिलेनं चावा काढल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध ठेवण्याऱ्या महिलेला त्या पुरुषाच्या पत्नीने समज दिली. मात्र, त्यानंतर अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेनं कहरच केला. अनैतिक संबंध आहेत, त्या पुरुषांच्या पत्नीला चावा काढला. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात ही घटना घडली आहे. यात महिला जखमी झाली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली दिली आहे. त्यानुसार, पतीचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे गेल्या काही महिन्यांपासून आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. फिर्यादी महिलेनं पतीला आणि त्या महिलेला रंगे हाथ पकडलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, पतीचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेला फिर्यादी महिलेनं अनेकदा समज दिली. मात्र, त्यांचे अनैतिक संबंध सुरूच होते. त्यामुळे फिर्यादी महिलेनं अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या पतीला फोन लावण्यास सांगितला होता. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपी महिलेनं फिर्यादी महिलेच्या उजव्या हातास कडाडून चावा घेत शिवीगाळ केली आणि मारहाण केली.

फिर्यादी महिलेनं संपूर्ण माहिती तक्रारीत दिली असून, हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून अधिक तपास येलमार करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 4:13 pm

Web Title: pune crime news pune police extra marital affair case registerd agains women bmh 90 kjp 91
Next Stories
1 पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा डोक्यात रॉड मारून खून
2 पुण्यात टाळेबंदीची आवश्यकता नाही
3 मुलांना संसर्ग झाल्यास स्वतंत्र रुग्णालय
Just Now!
X