News Flash

पुणेः आईच्या प्रियकराकडून खंडणी मागणाऱ्या मुलीसह तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले

त्याने मे २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत २ लाख ६० हजार रुपये वेळोवेळी दिले. तरी देखील त्या दोघांकडून सतत पैशाची मागणी होत राहिली

crime-1
(प्रातिनिधीक फोटो)

पुण्यातील एका महिलेचे तिच्याच इमारतीमधील एका तरुणाशी प्रेम संबंध होते.याबाबतची माहिती तिच्या मुलीला मिळताच, तिने तिच्या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने १५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 1 लाख रुपये घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले असून एका आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी माहिती दिली.

घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये एक महिला पती आणि मुलीसोबत राहत होती. त्याच इमारतीमध्ये राहणार्‍या एका तरुणाशी सुरुवातीला त्या महिलेची ओळख होती.नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.त्या दोघांमध्ये सतत फ़ोन, व्हॉट्सअपवर चॅटिंग होत असत. त्या दोघांमध्ये काही तरी सुरू आहे,अशी माहिती त्या मुलीला मिळाली.त्यानंतर त्या मुलीने आईचा मोबाईल पहिला असता, त्यामध्ये तरुणासोबतचे फोटो, चॅटिंग आढळून आले.

त्यानंतर त्या मुलीने हा सर्व प्रकार तिच्या प्रियकराला सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून आईच्या प्रियकराला तू जर आम्हाला १५ लाख रुपये दिले नाहीस तर तुझे फोटो आणि मेसेज सोशल माध्यमांत व्हायरल करु,अशी धमकी दिली. या धमकीमुळे तो घाबरला. आपली बदनामी व्हायला नको या कारणामुळे त्याने मे २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत २ लाख ६० हजार रुपये वेळोवेळी दिले. तरी देखील त्या दोघांकडून सतत पैशाची मागणी होत राहिली, सतत मानसिक त्रास देणे सुरूच राहिले.

त्या पीडित तरुणाने सर्व हकिकत पोलीसांना सांगितली. त्याच दरम्यान ३ सप्टेंबर रोजी पीडित तरुणाला १ लाख रूपयांची मागणी केली आणि हे पैसे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळ इथे देण्याचे ठरले. त्यानुसार आम्ही सापळा रचून ३ सप्टेंबर रोजी त्या मुलीच्या प्रियकराला,त्या मुलीला रंगेहाथ पकडले आहे. या दोघांना साथ देणारा आणखी एका मित्राचा शोध घेतला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 3:00 pm

Web Title: pune crime pune crime news girl arrested for blackmailing mothers boyfriend vsk 98 svk 88
Next Stories
1 …अन् भर कार्यक्रमात चक्क दारुडाच अजित पवारांच्या पाया पडायला आला
2 निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट; ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा आरोप
3 VIDEO: स्त्री शिक्षणाच्या पहिल्या बळीचा साक्षीदार बाहुली हौद
Just Now!
X