News Flash

पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ मंदिर उघडं राहणार का? ट्रस्टने केली महत्त्वाची घोषणा

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने केली महत्त्वाची घोषणा

( संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला (बुधवार, दि. ३१ मार्च) दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तरी गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश नाही :-
दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
ऑनलाइन दर्शन :-
भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 1:19 pm

Web Title: pune dagdusheth halwai temple will be closed on sankashti chaturthi 2021 due to increase number of covid 19 patients sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दुर्दैव! पुण्याच्या फॅशन स्ट्रीटची भीषण आग विझवली, पण घरी जाताना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं!
2 पुणे : डोंगरावरून प्रत्येक चेंडूवर दुर्बिणीद्वारे लक्ष ठेवून भारत-इंग्लड मॅचवर लावत होते सट्टा, पोलिसांचा दणका
3 पुणे : फॅशन स्ट्रीट मार्केटची राखरांगोळी; साडेतीन तासांत ४४८ दुकानांचा कोळसा
Just Now!
X