09 March 2021

News Flash

आता चर्चा नको, जीआर हाती द्या, मूकबधिर आंदोलकांचा पवित्रा

गेल्या २३ तासांपासून मूकबधिर तरुण उपाशीपोटी आंदोलन करत आहेत.

विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालय येथे राज्यभरातून एकत्र आलेल्या मूकबधिर आंदोलकांवर सोमवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालय येथे राज्यभरातून एकत्र आलेल्या मूकबधिर आंदोलकांवर सोमवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गेल्या २३ तासांपासून मूकबधिर तरुण उपाशीपोटी आंदोलन करत आहेत. सरकारने आता चर्चा न करता थेट जीआरच काढावा असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

मूकबधिर आंदोलनावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये ३३ जण जखमी झाले आहेत. मागील २३ तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांशी चर्चा करून त्यांनी सरकारवर निशाणाही साधला.

दरम्यान, सरकारवर सर्वस्तरातून टीका होत असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पण या दरम्यान, मूकबधिर तरुणांशी सांकेतिक भाषेत बोलण्यासाठी कोणी नसल्याने संवाद साधला गेला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता दिलीप कांबळे आंदोलन ठिकाणी येऊन पुन्हा संवाद साधणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 8:32 am

Web Title: pune deaf protester demand gr from state government
Next Stories
1 प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय पुण्यात
2 दोन वर्षांत काम पूर्ण?
3 कुटुंब रंगलंय ‘सावरकर भक्ती’त!
Just Now!
X