News Flash

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या खांद्यावर पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, ते पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेदेखील या पूर्वीपासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर काम करत आहेत. आता त्यांच्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पुण्यामधून पंतप्रधान कार्यालयात जाणारे तिसरे अधिकारी ठरले आहेत.


पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ते उपसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:52 pm

Web Title: pune district collector appointed as deputy secretary prime minister narendra modi office jud 87
Next Stories
1 प्रवासी वाहतुकीसाठी सुपरसॉनिक विमानाचा प्लान, व्हर्जिन गलॅक्टिक आणि रोल्स रॉयस आले एकत्र
2 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत
3 Coronavirus: “अमेरिका उत्तम कामगिरी करत आहे मात्र भारत…”; ट्रम्प यांचं भारतासंबंधी मोठं वक्तव्य
Just Now!
X