26 January 2020

News Flash

पुणे: ‘डीएसकें’च्या भावाला १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मकरंद कुलकर्णींना मंगळवारी अटक करण्यात आली होती.

(File/Express Photo: Ganesh Shirsekar)

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसकेंचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना मंगळवारी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात असता न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

ठेवीदारांची २ हजारांहून जास्त फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणारे डीएसके घोटाळ्यातील बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. मकरंद कुलकर्णी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. नंतर त्यांना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मकरंद कुलकर्णी फरार होते. यानंतर पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.

दरम्यान, मंगळवारी अटक केल्यानंतर मकरंद कुलकर्णी यांना पुण्यातील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत याप्रकरणी डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)न न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती. कुलकर्णी यांच्या परदेशात मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. कुलकर्णी यांच्या शहरात आणखी काही मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली होती. धायरी भागात त्यांच्या १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले. पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी भागात त्यांच्या मालमत्ता असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या जागांची किंमत बाजारभावानुसार दोनशे ते तीनशे कोटी रूपये असण्याची शक्यता आहे.

First Published on August 14, 2019 1:54 pm

Web Title: pune dsk brother makarand kulkarni judicial custody till 17th august fraud case 2 thousand crore jud 87
Next Stories
1 पुण्यात झालेल्या गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू
2 पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी
3 स्वतंत्र पोलीस आयुक्तालयानंतरही पिंपरीतील गुन्हेगारी कायम
Just Now!
X