News Flash

पुणे : दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्रींच्या मूर्तीस सुवर्ण वस्त्रासह मंदिरास फुलांनी सजवण्यात आले होते.

शहरातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने आज (बुधवार) १२२ वा दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त पुण्यातील मंडई परिसरातील श्री दत्त मंदिरात फुलांची सुंदर आणि नेत्रदिपक अशी आरास करण्यात आली होती.

यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा दत्त जयंती निमित्त श्रींच्या मूर्तीला सुवर्ण वस्त्र परिधान करण्यात आले होते, त्यामुळे मूर्ती अधिकच उठून दिसत होती. विशेष म्हणजे या सुवर्णवस्त्रास खडे आणि हिऱ्यांनी देखील मढवण्यात आले होते.

यंदा भाविकांसाठी ट्रस्टच्यावतीने स्वहस्ते अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. दत्त जयंतीच्या शुभ मुहुर्तावर दर्शनास आलेल्या अनेक भाविकांनी स्वहस्ते अभिषेक केले. आज पहाटे ६ वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी सुरू केली होती, अशी माहिती उत्सव प्रमुख शिरीष मोहिते यांनी दिली..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 9:30 pm

Web Title: pune dutt jayanti celebrate with excitedly msr 87
Next Stories
1 ओएलएक्सवर गाडी विकली, मालकानं पुन्हा चोरली आणि…
2 पुणे- उच्चशिक्षित चोराकडून २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत; पायी चालणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावयचा
3 ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास उत्साहात प्रारंभ
Just Now!
X