09 August 2020

News Flash

पुणेकर इंजिनिअरला १.९२ लाखांचा गंडा, युरोपात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक

टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला आणि इमेलद्वारे नियुक्ती पत्रही पाठवले...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

युरोपात नोकरीचं आमिष दाखवून पुण्यातील एका इंजिनिअरची १.९२ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. वडगाव धायरी येथील ४२ वर्षीय इंजिनिअरने याप्रकरणी पुणे साइबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

२२ जून ते ३ जुलै या दरम्यान ही फसवणूक झाल्याची माहिती आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीत प्रोडक्शन इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने नोकरी बदलण्याच्या उद्देशाने ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर त्याला एका रिक्रुटमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्याने फोन केला आणि बेल्जियमच्या एका कंपनीत नोकरीची बतावणी केली.

कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्याचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला आणि इमेलद्वारे नियुक्ती पत्रही पाठवले. त्यानंतर बेल्जियम दूतावासाकडून काही कागदपत्र आणि परवाना घेण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार तीन विविध बँकांमध्ये पैसे ट्रांसफर केले, पण त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर या इंजिनअरने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी मोबाइल नंबर आणि इ-मेल आयडीबाबत तपास सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 8:36 am

Web Title: pune engineer offered good job in foreign country duped of rs 1 92 lakh sas 89
Next Stories
1 आयसिसचे दहशतवादी असल्याच्या संशयावरून पुण्यात दोघांना अटक
2 पुण्यात खरेदीसाठी झुंबड
3 करोनाची संसर्गसाखळी तोडण्यातील उणिवा स्पष्ट
Just Now!
X