पुणे शहरातील मुंबई बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी, तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने आज सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ट्रक जात होता. तेवढ्यात नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे समोरील पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. या धडकेत त्या सर्व गाड्यांचे नुकसान झाले.
या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. तर या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 10:09 pm