27 September 2020

News Flash

पुणे : टिक-टॉक व्हिडिओच्या नादात तरुणाच्या दिशेने झाडल्या गोळ्या

याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमध्ये टिक-टॉक व्हिडिओ पाहात  उभा असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यात तो सुदैवाने बचावला आहे, विरोधातील व्यक्तीच्या सोबत असल्याच्या संशयावरून महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.

रोशन सोळंकी आणि चैतन्य कदम असे गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना शोध सांगवी पोलीस घेत आहेत. दरम्यान, फिर्यादिवर देखील महाविद्यालयात मारामारी केल्याचा गुन्हा दाखल आहे तर यातील आरोपी रोशनवर तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जुनी सांगवी येथील गंगोत्री निवास येथे फिर्यादी महाविद्यालयीन तरुण आणि त्याचा मित्र हे मोफत वाय-फायवर टिक-टॉक व्हिडिओ पाहत रस्त्यावर उभे होते. तेव्हा, रोशन आणि चैतन्य हे एकच दुचाकीवरून आले. फिर्यादी दिसल्यानंतर दुचाकी हळुवार घेत दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या रोशनने महाविद्यालयीन तरुणाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, केवळ नशीब बलवत्तर असल्याने यात तो बचावला आहे.

दरम्यान, हा गोळीबार रोशनच्या विरोधातील वसीम खान यांच्यासोबत फिर्यादी राहात असल्याच्या संशयावरून झाला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे. अद्याप आरोपी फरार असून त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 2:45 pm

Web Title: pune fire tik tok young boy police nck 90
Next Stories
1 अजित पवार यांच्याकडे ७४ कोटींची संपत्ती
2 कोथरूडमध्ये विरोधक एक
3 नवरात्रीत शेवंती २०० रुपये किलो
Just Now!
X