एकीकडे करोनाचं संकट अद्यापही पूर्पणणे टळलं नसल्याने गर्दीवर बंधनं असताना दुसरीकडे पुण्यात कारागृहातून सुटका झालेल्या गुंडाची मिरवणूक काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार पुण्यात घडला असून गुंड गजानन मारणे याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. समर्थकांनी तब्बल ३०० वाहनांचा ताफा सोबत घेत ही मिरवणूक काढली.

गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

पुण्यात गेल्या काही वर्षात टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडांवर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत कारागृहात रवानगी केली होती. याचदरम्यान अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एका हत्येप्रकरणी गुंड गजानन मारणे याची मोक्काअंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने तिथे होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.