News Flash

पुण्यातील मानाच्या गणपतींचे हौदातच मूर्ती विसर्जन

राज्यातील दुष्काळ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यामुळे घेतला निर्णय

पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळ

पुण्यातील मानाचे पाच गणपती, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा मुठा नदीऐवजी महापालिकेने बांधलेल्या हौदामध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पाच गणपती मंडळांनी यंदा हौदात मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा विसर्जनसाठी मुठा नदीमध्ये नेहमीपेक्षा कमी पाणी सोडण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला १२ तासांत ०.०७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला. त्यांच्या निर्णयावर अनेक पुणेकरांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली.
शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, केवळ विसर्जनासाठी पाणी सोडण्याला विरोध करण्यात आला. मात्र, गणपती मंडळासाठी पाणी नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मानाच्या पाचही गणपतींसोबतच मंडई आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानेही हौदातच मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन पाणी सोडण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 7:07 pm

Web Title: pune ganpati idols immersion in tanks
Next Stories
1 ‘आपले पुणे’तर्फे नागरिकांचा विकास आराखडा प्रसिद्ध
2 गणेशोत्सवाने उत्साही गर्दीचा उच्चांक अनुभवला
3 नोंदणी झालेल्या ५६ हजार मुलांपैकी शाळेत किती?
Just Now!
X