News Flash

पुणे : प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

चार आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असून दोन आरोपी फरार आहेत

सहा जणांनी या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केलीय (प्रातिनिधिक फोटो)

पिंपरी-चिंचवडमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवलेला व्हिडिओ इतरांना पाठवण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी प्रियकरासह चार जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुले फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आरबाज खान, सुलतान उर्फ मुश्ताक सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन खान व सोहेल शेरअली पिरजादे यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन मुले फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी अरबाज खान यांचे प्रेमसंबंध होते. त्यांचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आरोपी मुश्ताक सय्यदने मोबाईलमध्ये शूट केला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर मुश्ताकने या तरुणीवर बलात्कार केला. हा व्हिडीओ इतर आरोपींना आणि अल्पवयीन मुलांना पाठविल्याने त्यांनी देखील पीडित तरुणीला धमकावत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

या सर्व प्रकरणाला कंटाळून अखेर २२ वर्षीय तरुणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे गेली होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालत तातडीने गुन्हा दाखल करण्यास सांगत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर, देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल करत गुन्हे शाखा युनिट दोनने आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी अद्याप दोन अल्पवयीन मुले फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 4:25 pm

Web Title: pune girl gang rape by 6 men including minor kpj 91 scsg 91
Next Stories
1 …म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा
2 पुणे : “साहेब, मी मित्राचा खून केलाय… मला अटक करा”
3 काढ्यांच्या मात्रेसाठी गुळाला भाव
Just Now!
X