News Flash

धक्कादायक! कुटुंबियांसोबत पुण्यातल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती तरुणी, पण वेटरने…

१८ व्या वाढदिवसानिमित्त तरुणी कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेली होती....

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यात कुटुंबियासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणीचे स्वच्छतागृहात एका वेटरने मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी पाषाणमधल्या सुतारवाडी परिसरात असलेल्या ‘हॅप्पी द पंजाब’ या हॉटेलमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक तरुणी गेल्या सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसमवेत सुतारवाडी, बंगलोर-मुंबई महामार्गालगत असलेल्या हॅप्पी द पंजाब या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. थोड्यावेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली, तिची आई बाहेर वाट बघत होती. पण त्यावेळी कोणीतरी लपून चित्रीकरण करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. लगेच तरुणी जोरात ओरडली, तिच्या आईने आणि तिने तातडीने हॉटेलच्या मॅनेजरला प्रकार सांगितला. हॉटेल मॅनेजरने तातडीने लागूनच असलेल्या पुरुषांच्या शौचालयामध्ये धाव घेतली आणि एका तरुणाला पकडलं. नंतर त्याला बाहेर आणून त्याच्याकडून मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्न सुरू असताना आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर हॉटेल प्रशासनाने प्रकरण मिटल्याचं खोटं सांगत वेटरला पुन्हा बोलावून घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

आणखी वाचा- पुणे : डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी हाफिज अन्सारी नावाच्या आरोपी वेटरविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ‘354अ’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:39 pm

Web Title: pune hotel waiter caught taking video of girl in loo sas 89
Next Stories
1 पुणे : डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
2 पुणे : दोन भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी
3 राज्यात पावसाचा तेरावा महिना
Just Now!
X