25 October 2020

News Flash

पुणे : गणेश पेठेतल्या दुध भट्टीत लिटरमागे २० ते २२ रुपयांनी दूध दरवाढ

राज्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाचा तुटवडा

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील गणेश पेठेत दररोज शहर आणि ग्रामीण भागातून दूध उत्पादक शेतकरी किरकोळ दूध विक्रीसाठी येथे येत असतो. मात्र, मागील चार दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रती लिटर पाच रुपये जमा करण्यात यावेत यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे तेथील बाजारामध्ये दुधाच्या मागणीत वाढ झाल्याने लिटर मागे २० ते २२ रुपयांनी वाढ झाली आहे.

दूध उत्पादक शेतकयाच्या खात्यात थेट पाच रुपये जमा करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानीकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह हॉटेल चालकांना बसला आहे. ग्रामीण भागातून अधिक प्रमाणात दूध शहरात येत असते. मात्र, स्वाभिमानीकडून ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवण्यात येत आहेत. पुण्यात देखील काही ठिकाणी दूध घेऊन जाणारे टँकर फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पुणे शहरात मागील चार दिवसांपासून अधिक प्रमाणात दूध टंचाई जाणवत आहे.

याविषयी गणेश पेठ दूध भट्टी येथील व्यापारी दामोदर हिंगमिरे म्हणाले, शहर आणि जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध विक्रीसाठी गणेश पेठ येथे येत असतात. दररोज साधारण ५ हजार लिटरच्या आसपास दुधाचे येथे संकलन होते. नेहमीप्रमाणे सरासरी दराप्रमाणे येथे दुधाची विक्री होत असते. मात्र, चार दिवसात बंद पिशवीमधील दूध पुरवठा घटल्याने हॉटेल चालक आणि नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. दुधाची मागणी वाढल्याने १८ लिटरला मंगळवारी ९०० रुपये, बुधवारी १ हजार २०० रुपये तर आज १ हजार २८० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे आज लिटर मागे २० ते २२ रुपयांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात आणखी भाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 7:15 pm

Web Title: pune in the sale of milk bhatti at ganesh peth the price of milk has been increased by 20 to 22 rupees
Next Stories
1 शिवनेरी बस बंद पडल्याने मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी
2 हिंजवडीत वेश्या व्यवसाय; सात तरुणींची वेश्या व्यवसाय सुटका
3 राष्ट्रपती राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी महापालिकेकडून जावडेकरांकडे बोट
Just Now!
X