News Flash

सर्वोत्कृष्ट प्रशासनाच्या बाबतीत देशात पुणे अव्वलस्थानी

बंगळुरु सर्वात शेवटच्या क्रमांकावर

(संग्रहित छायाचित्र)

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे मागच्या काही काळापासून आयटीहब आणि निवृत्तांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या ओळखीमध्ये आणखी एक भर पडली असून पुणे हे देशातील उत्तम शासन असलेले शहर असल्याचे एका अहवालातून नुकतेच समोर आले आहे. या स्पर्धेमध्ये २० राज्यांमधील २३ शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पुण्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. ‘इंडियाज सिटी सिस्टीम फॉर २०१७’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून पुण्याने १० पैकी ५.१ गुण मिळवत इतर शहरांना मागे टाकले आहे.

यामध्ये दिल्लीला ४.४ तर मुंबईला ४.२ गुण मिळाले आहेत. त्यामागोमाग कलकत्ता, थिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, सुरत हे त्यामागोमाग आहेत. शहरातील एकूण शासकीय कामकाजाचा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. एकूण ८९ प्रश्नांवरुन हे गुण देण्यात आले आहेत. त्यातही कायदे, धोरणे आणि माहिती अधिकार यांचा विचार कऱण्यात आला आहे. विशेष म्हणजे आयटीहब म्हणून ओळख असलेले बंगळुरु यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

पालिकेतील अनेक व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्यात आल्याने नागरिकांकडून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. याअंतर्गत परदेशातील मेट्रो शहरांचेही सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, यूकेतील लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांना चांगली रँक मिळाली आहे. यामध्ये पायाभूत सोयीसुविधा, इतर सेवा, राजकीय नेतृत्व, आर्थिक नियोजन आणि इतरही अनेक बाबींमध्ये पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग असल्याचे हे सर्वेक्षण कऱणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने नोंदविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 5:03 pm

Web Title: pune is on 1st position in urban governance survey bangluru is at down
Next Stories
1 FB Live बुलेटीन: बिल्डरकडून खंडणी मागणाऱ्या सेना जि.प. सदस्याला अटक, अखिलेश यादवांचा भाजपला टोला व अन्य बातम्या
2 आदिवासींची मुंग्यांची चटणी इंग्लंडमधल्या प्रसिद्ध शेफच्या मेन्यूकार्डवर
3 सवर्ण मुलीवर प्रेम केल्यामुळे दलित तरुणाला बेदम मारहाण करुन ठार मारले
Just Now!
X