News Flash

पुणे : हवेत गोळीबार करत ज्वेलर्सचे दुकान लुटले

कोथरूड भागात दिवसा घडली खळबळजनक घटना

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील कोथरूड भागातील पेठे ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हवेत गोळीबार करत, दुकानातील दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी भरदिवसा घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील आनंदनगर येथील मुख्य चौकात पेठे ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास काही ग्राहक दागिण्यांची खरेदी करत होते. याच दरम्यान दोन व्यक्ती दुकानात शिरल्या आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर दुकानातील सर्वांना धमकावून, त्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. नेमके किती लाखांचे दागिने त्यांनी पळवले आहेत. या संदर्भात चौकशी सुरू असून परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत असल्याची कोथरूड पोलिसांनी माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 7:23 pm

Web Title: pune jewellery shop looted by firing in the air msr 87
Next Stories
1 महिन्याच्या शेवटच्या रविवारी बागकामप्रेमींचा कट्टा
2 आत्महत्या होत असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार स्थापण्याच्या वल्गना
3 राज्य ग्राहक आयोगाचे कामकाज विस्कळीत
Just Now!
X