News Flash

पुण्यातील काका हलवाई दुकानाला लागली आग

अग्निशमन दल काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले

पुण्यातील शास्त्री रोड वरील काका हलवाई दुकानाला आग लागण्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्री रोडवरील ‘काका हलवाई स्वीट होम’च्या आतील बाजूला एक ऑफिस आहे. त्याला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आतील ऑफिस जळून खाक झाले होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता असून तीन गाड्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 8:36 am

Web Title: pune kaka halwai shop catch fire svk 88 scsg 91
Next Stories
1 करोनाबाधित रुग्णाची रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या
2 डॉ. माधव गाडगीळ यांचे बांबूच्या प्रजातीला नाव 
3 राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नाबार्डच्या निकषांपेक्षा अधिक कर्ज
Just Now!
X