कोंढवा येथे इमारतीची भिंत पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना बिहार सरकारने प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे नागरिक असलेल्यांच्या कुटुंबीयांना ही मदत देणार असल्याची घोषणा केली. पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यामध्ये काही बिहारच्या तर काही उत्तर प्रदेशच्या कामगारांचा समावेश आहे.
याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात अाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोंडवा पोलीस स्थानकातही संबंधितांविरोध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. तसेच, पीडितांना लवकरात लवकर मदतनिधी सुपूर्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.