News Flash

माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७५ वर

दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात

| August 2, 2014 01:09 am

दरड कोसळून झालेल्या माळीण दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी ७५ वर जाऊन पोहचली. शनिवारी सकाळी मातीच्या ढिगाऱ्याखालून माळीण गावातील आणखी पाच दुर्दैवी रहिवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या ७५ इतकी झाली असून, मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १०० जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३७ महिला आणि दहा लहान मुलांचा समावेश आहे.
सतत कोसळणारा पाऊस आणि मातीचा चिखल यामुळे हे मृतदेह काढणे, त्यांचे शवविच्छेदन करणे, ओळख पटवणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे ही सारी प्रक्रिया अतिशय जिकिरीची होऊन बसली आहे. परिणामी या परिसरात असह्य़ दुर्गंधी दाटू लागली असून गावातील अन्य रहिवासी तसेच मदतकार्यात करणारे जवान व नागरिक यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. बचावकार्य पूर्ण होण्यास आणखी २-३ दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रु. देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:09 am

Web Title: pune landslide toll climbs to 75 many more feared buried
Next Stories
1 माळीणमधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत
2 प्राणिमित्र आणि नागरिकांमध्ये दुवा साधणारे ‘प्राणिमित्र’ अॅप
3 समता भूमीच्या वैभवात नव्या स्मारकाची भर
Just Now!
X