पुण्यात समलैंगिक जोडीदारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी रुग्णालयातून पळाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनुराग भाटिया असे या आरोपीचे नाव असून त्याला रविवारी उपचारासाठी कमलनयन रुग्णालयात नेण्यात आले असताना ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील एका व्यावसायिकावर भाटियाने हल्ला केला होता. समलैंगिक संबंधास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केला होता. या प्रकरणी सागर भाटियाला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने भाटियाला पोलीस कोठडी सुनावली होती. उलटी व जुलाब होत असल्याने त्याला पोलिसांनी कमलनयन रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याची तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी औषधासाठी चिठ्ठी लिहून दिली होती. औषधे आणण्यासाठी उमाजी राठोड हे मेडीकलमध्ये गेले होते. त्याच वेळी आरोपीने शौचास जायचे आहे असे सांगितले.त्यानंतर आरोपी अनुरागने शौचालयातील उघड्या खिडकीमधून पळ काढला.

कोणत्या प्रकरणी झाली होती अटक ?
या प्रकरणातील फिर्यादी हा व्यावसायिक असून त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही कालावधीत त्याचा घटस्फोटदेखील झाला होता. दोन वर्षांपूर्वी त्याची भाटियाशी ओळख झाली होती. ते दोघे सतत भेटत असत आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. दोन वर्षांपासून दोघांमध्ये संबंध होते. मात्र, भाटिया वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता. फिर्यादीच्या नकारामुळे भाटियाने त्याच्यावर गेल्या आठवड्यात हल्ला केला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune man arrested who stabs gay partner escapes hospital
First published on: 24-09-2018 at 16:15 IST