News Flash

पुणे: तरसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला दिला होता इशारा; वनविभागाचं स्पष्टीकरण

खेड तालुक्यातील खारपुडी गावात गेल्या रविवारी एका तरसाच्या हल्ल्यात दोन पुरुष जखमी झाले होते.

animal attack
पुण्यात दोन व्यक्तींवर हल्ला करणाऱ्या तरसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पुण्यात दोन व्यक्तींवर हल्ला करणाऱ्या तरसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.खेड तालुक्यातील खारपुडी गावात गेल्या रविवारी एका तरसाच्या हल्ल्यात पांडुरंग सहादू जाधव (७०) आणि दुचाकीस्वार राहुल मधुकर गाडे (२५) हे दोन पुरुष जखमी झाले होते. या हल्ल्यावर आता वन विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तींना हल्ल्याआधी इशारा देण्यात आला होता.

तरसाच्या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली तर गाडे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दोघांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण कोर्स देण्यात आला. जखमी झालेल्या तरसाला नंतर वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी घटनेचा साक्षीदार असणाऱ्या व्यक्तीची साक्ष नोंदवली.

वाचा या प्रकरणाबद्दल सविस्तर…

“आम्ही व्हिडिओ शूट केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला आहे. तो परिसरातील एका मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटातील होता. गटाने काही मिनिटांपूर्वी या तरसाला पाहिलं होतं आणि वृद्ध व्यक्तीला त्या दिशेने जाऊ नका असे सांगितले होते. त्यांनी त्याला सांगितले की तरस रस्त्याच्या अगदी जवळ आहे आणि शक्यतो हल्ला करण्याच्या विचारात आहे. परंतु जाधव यांनी त्यांना सांगितले की परिसरात तरस आढळणं सामान्य आहेत आणि त्याच दिशेने चालत आहेत. काहीतरी घडेल याचा अंदाज घेऊन त्या माणसाने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आम्ही व्हिडिओग्राफरचे वक्तव्य रेकॉर्ड केले आहे”,उप वनसंरक्षक (जुन्नर विभाग) जयरामेगौडा आर यांनी इंडियन एक्सप्रेसने सांगितलं.

जयारामेगौडा यांनी नमूद केले की, तरसांनी केलेले हल्ले अत्यंत दुर्मिळ आहेत. प्राण्याने भूक, निर्जलीकरण आणि दुखापतीमुळे दोन पुरुषांवर हल्ला केला, असे ते म्हणाले. जयारामेगौडा असेही म्हणाले की, वन विभागाने गस्त आणि जागरूकता मोहिमेद्वारे परिसरात दक्षता वाढवली आहे. जयारामेगौडा यांनी असेही सांगितले की, वन विभागाने दोन जखमी व्यक्तींना मानकांनुसार भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 11:57 am

Web Title: pune man injured hyena viral video warned attack forest department vsk 98
Next Stories
1 पुणे : बिग बास्केट कंपनीच्या बावधनमधील गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचं नुकसान
2 राज्य बँकेला रिटेल बँकिंगच्या अनुमतीसाठी गडकरींची मध्यस्थी
3 पिंपरी-चिंचवड : इमारतीच्या १६ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग; दोन जण जखमी
Just Now!
X