News Flash

पुण्यातला धक्कादायक प्रकार; धावत्या रिक्षात सहप्रवाशी महिलेकडे बघून हस्तमैथुन; आरोपीला अटक

पुण्यातला घृणास्पद प्रकार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडे पाहून सहप्रवाशाने हस्तमैथून केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला आपल्या लहान मुलाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात रिक्षातून घेऊन जात असताना हा प्रकार घडला. सोहेब इक्बाल कुरेशी असं अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे.

पीडित महिला मोरवाडी येथून शेअरिंग रिक्षातून आपल्या लहान मुलाला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रिक्षात बसलेली व्यक्ती आपल्याकडे बघून अश्लील कृत्य करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर रिक्षा वायसीएम रुग्णालयाजवळ पोहोचताच महिला रिक्षातून उतरली आणि तिने आवारातच असलेल्या पोलिस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली, नंतर तातडीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. ‘रिक्षातून उतरताच महिलेने तातडीने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलिस चौकीत धाव घेतली आणि पोलिसांना आरोपीबाबत सतर्क केलं. लगेच स्थानिकांच्या मदतीने आरोपी सोहेब इक्बाल कुरेशी याला अटक करण्यात आली’, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 8:54 am

Web Title: pune man masturbates in autorickshaw while staring at woman co passenger arrested sas 89
Next Stories
1 प्राधान्यगटांनाच लस!
2 लोकजागर : करपलेले भविष्य
3 स्पर्धा परीक्षार्थींमध्ये अस्वस्थता
Just Now!
X