News Flash

महात्मा फुले मंडई आता वाय-फाय!

मंडई भागातील ३०० मीटर परिसर वाय-फाय करण्यात आला आहे. ५० हजार गिगाबाईट्स (जीबी) एवढी या वाय-फाय सेवेची स्टोअरेज क्षमता अाहे.

महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग परिसरामध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एक वेळ वाहन लावायला जागा मिळणार नाही, पण आता मोबाईल आणि इंटरनेटची सुविधा तीही विनामूल्य वापरता येणार आहे.
पुण्याच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि ‘मंडई विद्यापीठ’ असा लौकिक प्राप्त केलेला महात्मा फुले मंडई परिसर आधुनिकतेची कास धरून  वाय-फाय झाला आहे. मराठी दिनाचे औचित्य साधून शनिवारी (२७ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता उद्घाटनाद्वारे तो कार्यान्वित होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले मंडई प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून त्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला आहे.
मंडई भागातील ३०० मीटर परिसर वाय-फाय करण्यात आला आहे. ५० हजार गिगाबाईट्स (जीबी) एवढी या वाय-फाय सेवेची स्टोअरेज क्षमता असून एकावेळी कितीही लोक विनामूल्य इंटरनेट वापरू शकतील. सारे जग नेटच्या जाळ्यामध्ये येत असताना मंडई परिसर त्यापासून दूर राहून कसे होणार, ही त्यामागची भूमिका असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले. खासदार संजय काकडे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन होणार असून माजी आमदार मोहन जोशी, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत भट, फरासखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेखा साळुंके, खडक पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ जाधव, पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष नीलेश ढमढेरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:27 am

Web Title: pune mandai area now wi fi
Next Stories
1 रेल्वे अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया
2 महिलांसाठी अपुरी स्वच्छतागृहे, आत अस्वच्छतेचा कळस!
3 संयुक्त लष्करी सरावासाठी विविध देशांचे अधिकारी दाखल
Just Now!
X