26 February 2021

News Flash

पुणे : मराठी इन्स्टाग्राम स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

घरातील पंख्याला साडीने गळफास लवून संपवलं जीवन

मराठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समीर गायकवाड या २२ वर्षीय तरुणाने रविवारी सायंकाळी पुण्यातील राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केलीय. इन्स्टाग्रामवर समीर हा एका नावाजलेला चेहरा होता. मागील महिन्याभरामध्ये तो इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय झाला झालेला. समीरने अल्पवाधीमध्ये व्हिडीओंच्या माध्यमातून तरुणाईला आवडणाऱ्या स्टाइलमध्ये वैचारिक संदेश देण्याच्या कलेमुळे अफाट लोकप्रियता मिळवलेली. समीरच्या मृत्यूसंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर इन्सटाग्रामवरील त्याच्या चाह्त्यांना या बातमीवर विश्वासच बसत नाहीय.

समीर गायकवाडने वाघोली येथील केसनंद रोडवरील निकासा सोसायटीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. घरातील आपल्या रुममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने फास लावून समीरने आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्थानकामध्ये कळवली. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही असं पोलिसांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये आता समीरच्या भावाची आणि जवळच्या नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच समीरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भातील काही माहिती समोर येऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

समीरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खास व्हिडीओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@samir_gaikwad1999_official)

आत्महत्येच्या दिवशीही त्याने सकाळी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याच्या वृत्तावर अनेकांचा विश्वास बसत नाहीय. इतरांना प्रेरणादायी संदेश देणाऱ्या, अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या सामीरला आत्महत्या करावीशी का वाटली असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@samir_gaikwad1999_official)

पुण्यातील वाडिया कॉलेमध्ये शिकणारा समीर मागील काही काळापासून इन्टाग्रामवरील व्हिडीओंमुळे प्रचंड लोकप्रिय झाला होता. समीर त्याचा रुबाबद, भारदस्त आवाजाबरोबरच लूक्स आणि व्हिडीओमधील संदेशांमुळे लोकप्रिय झालेला. त्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 9:07 am

Web Title: pune marathi instagram star sameer gaikwad commits suicide scsg 91
Next Stories
1 माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी; शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी
2 पूर्वपरवानगीच्या आदेशाचा फेरविचार
3 राज्यातील तापमानात झपाट्याने बदल
Just Now!
X