महिनाभरापूर्वी दिवसांपूर्वी येरवडा येथील त्रिदल नगर सोसायटीत भटक्या श्वानांची आणि मांजरींचे हत्या प्रकरण घडले होते. मात्र, हे कृत्य सोसायटीमधीलच कोणीतरी व्यक्तीने केले असावे असा संशय आता येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

त्रिदलनगरमध्ये २८ डिसेंबर २०१८ रोजी ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी मरण पावल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुढील दहा दिवसांत आणखी ४ प्राण्यांचा येथे मृत्यू झाला होता. दहा दिवसांत एकूण १८ प्राण्यांच्या मृत्यूमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही भटकी कुत्री आणि मांजरं सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्यता या सोसायटीतील रहिवाशी आणि प्राणीमित्र राकेश जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण समितीचे सदस्य अमित शहा म्हणाले, पुणे शहरात यापूर्वी देखील भटक्या कुत्र्यांची सामुहिक हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आता याच घटनांची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच असे अघोरी कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या मुक्या प्राण्यांच्या सामुहिक हत्या प्रकरणी, जेल रोड पोलीस चौकीचे राहुल गिरमकर म्हणाले, त्रिदलनगरमध्ये मागील महिन्यात घडलेल्या प्राण्यांच्या हत्याप्रकरणी शासकीय पशू रुग्णालयात मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही तो उपलब्ध झाल्यानंतरच या प्राण्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.