28 September 2020

News Flash

पुणे : भाजपाच्या माथाडी विभाग अध्यक्षाला अटक

शाम राजू शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दत्तवाडी, सहकार नगर आणि येरवडा भागात गुन्हे दाखल आहे.

भाजपचा माथाडी विभागाचा अध्यक्ष शाम राजू शिंदे याने 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तिला भाजपात प्रवेश दिल्याने एकच चर्चा रंगली होती. तर आता याच माथाडी विभागाच्या अध्यक्षाने पाच लाख रूपयांची रोकड लुटल्या प्रकरणी खडक पोलिसांनी अटक केली आहे.

शाम राजू शिंदे (वय 31, रा. अरण्येश्वर) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी सेव्हन लव्हज चौकात पाच वाजण्याच्या सुमारास एका कुरिअर कंपनीत काम करणारा तरुण पाच लाख रुपये घेऊन चालला होता. तर त्याच दरम्यान आरोपी शाम राजू शिंदे हा त्याच्या साथीदारासह चार चाकी वाहनातून येऊन पाच लाख रूपयांची रोकड चोरल्याची घटना घडली. तर या घटनेनंतर आरोपी हा त्याच्या साथीदारासह पुणे शहरातून फरार झाला. या आरोपीचा शोध सुरू असताना. आमच्या खबऱ्या मार्फत शाम शिंदे हा लोणावळ्यात असल्याची माहिती मिळताच त्याला तिथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून संबधित रोकड हस्तगत करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

शाम राजू शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दत्तवाडी, सहकार नगर आणि येरवडा भागात गुन्हे दाखल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 10:57 am

Web Title: pune mathadi bjp crime police extortion arrest nck 90
Next Stories
1 हेल्मेटबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईला वेग
2 आळंदी, देहूत पालखी सोहळ्याची लगबग
3 कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या बछड्यांची सुटका
Just Now!
X