25 September 2020

News Flash

‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी धरला ठेका

पुण्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन सोहळा पार पडला

पुण्यात गुरुवारी मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन सोहळा पार पडला. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांसह अनेक नेतेमंडळीही सहभागी झाले होते. महापौर मुक्ता टिळक यादेखील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर ठेका धरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. याचदरम्यान गणेशोत्सव आल्याने राज्यातील अनेक भागात इच्छुक उमेदवार गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेताना पहावयास मिळाले. गुरुवारी लाडक्या गणरायाला सर्वांनी निरोप दिला. विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत राजकीय मंडळीनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात देखील सकाळपासून भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीला पुणेकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तर या सर्व मंडळाचे स्वागत महापौर मुक्ता टिळक यांनी अलका चौकात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये श्रीफळ देऊन केले. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांना एका गाण्यावर ठेका धरण्याचा आग्रह सर्वांनी केला. ते गाणं होतं ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतंय’…त्यांनीदेखील सर्वांचा आग्रह पाहता गाण्यावर ठेका धरला.

महापौर मुक्ता टिळक या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदार संघातून भाजपकडून इच्छुक आहेत. याच मतदारसंघातून भाजपकडून अनेक नेते मंडळी इच्छुक असल्याने महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवार मिळते का? हे पाहावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 11:28 am

Web Title: pune mayor mukta tilak dance during ganesh visarjan sgy 87
Next Stories
1 पुणे : अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी वाचविले नदीत बुडणाऱ्या सहा जणांचे प्राण
2 पिंपरी-चिंचवड शहरात २८ हजार मूर्तीदान; रात्री उशिरापर्यंत ५० हजार मूर्तीदान होणार!
3 उदयनराजे भाजपात नक्की येणार, मुख्यमंत्री सतत त्यांच्या संपर्कात – चंद्रकांत पाटील
Just Now!
X