12 July 2020

News Flash

नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक

वारंवार सूचना करूनही ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणारच-मुक्ता टिळक

मुक्ता टिळक (संग्रहित छायाचित्र)

पुण्यात नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्या अधिकाऱ्यांनी आपले काम नीट केले नाहीये त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यापूर्वी पुण्यातल्या १२४ ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ते साठू नये म्हणून कामे लवकर उरका असे आदेश महापौरांनी दिले होते. तरीही पुण्यातल्या काही ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना कशा घडल्या? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. पावसामुळे उपनगर आणि पेठ भागातल्या काही घरांमध्ये पाणी गेले. ज्यानंतर पुणेकरांना त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात पुण्याच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्न निर्माण झाला आहे.

नालेसफाईवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, असे असूनही पुणेकरांना त्रास का सहन करावा लागला? असे मुक्ता टिळक यांनी विचारले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी जी पाहणी करण्यात आली तेव्हाही प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तरीही पुण्यात पाणी साठले. त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्यांनी महापौरांचे ऐकण्यात दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. ही कारवाई नेमकी काय होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2017 9:31 pm

Web Title: pune mayor mukta tilak will take action against officers
Next Stories
1 पिंपरी चिंचवड महापालिकेत पाणी कपातविरोधात मनसेचे आंदोलन आणि घोषणाबाजी
2 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली टेमघर प्रकल्पाची पहाणी
3 सार्थक आणि श्रुती यांची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन आरोपींना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
Just Now!
X