पुण्यात नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्या अधिकाऱ्यांनी आपले काम नीट केले नाहीये त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यापूर्वी पुण्यातल्या १२४ ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ते साठू नये म्हणून कामे लवकर उरका असे आदेश महापौरांनी दिले होते. तरीही पुण्यातल्या काही ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना कशा घडल्या? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. पावसामुळे उपनगर आणि पेठ भागातल्या काही घरांमध्ये पाणी गेले. ज्यानंतर पुणेकरांना त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात पुण्याच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mayor mukta tilak will take action against officers
First published on: 12-06-2017 at 21:31 IST