26 November 2020

News Flash

पुण्याचे महापौर करणार प्लाझ्मा दान !

इतर नागरिकांनीही पुढाकार घेण्याचं केलं आवाहन

पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या दरम्यान मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ होते आहे. सध्याच्या घडीला शहरातील मृत्युदर २.४० टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायच्या दृष्टीने करोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने दिले आहेत.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, “पुणे शहरातील करोना बाधित रुग्णाची संख्या ९४ हजाराच्या पुढे गेली असून त्या दरम्यान २ हजाराहून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७६ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहे. या आकडेवारीवरून शहरातील करोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर २.४० टक्के इतका आहे”. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन येत आहे. त्या आवाहनाला नागरिकांचा आतापार्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून ७५० करोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आले आहेत. आता मी देखील प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:58 pm

Web Title: pune mayor murlidhar mohol decided to donate his plazma svk 88 psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 मित्राचा खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर; गुन्ह्याची दिली कबुली
2 VIDEO: १२९ वर्षांचा इतिहास असणारा पुण्याचा हत्ती गणपती
3 पिंपरी-चिंचवडमध्ये थरारक अपघात; भरधाव टँकरने सहा जणांना उडवले
Just Now!
X