News Flash

“प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी,” पुण्याच्या महापौरांचा गंभीर आरोप

पुणे पालिका कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार

मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुंबई हायकोर्टाने पुणे महापालिकेचे आयुक्त मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी बोलत का नाहीत? असा प्रश्नही विचारला. यावेळी कोर्टाने मुंबई मॉडेल इतर पालिकांनीही स्वीकारले पाहिजेत असा सल्ला दिला. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी असल्याचा गंभीर आरोप एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

“वस्तुस्थिती वेगळी असून कोर्टासमोर कोणी, कशी आकडेवारी दिली याची माहिती घेत आहोत. प्रत्यक्षात आणि कोर्टात सादर केलेली आकडेवारी वेगळी आहे. म्हणूनच आम्हाला खुलासा करणं भाग आहे,” असं ते म्हणाले आहेत.

“पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाउन करा”; मुंबई हायकोर्टाची उद्धव ठाकरेंना सूचना

“कोर्टात जी माहिती दिली जाते त्याच आधारे कोर्ट आपलं म्हणणं मांडत असतं. पण एक शंका आहे की, ही आकडेवारी नेमकी कधीची आहे. गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या आकडेवारीत विसंगती पहायला मिळत आहे. पुणे शहरातील स्थिती चांगली आणि नियंत्रणात आहे,” असा दावा महापौरांनी केला.

“पुण्यात गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या १६ हजारांनी कमी झाली आहे, पुण्यात १ लाखांच्या वर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असल्याचा दावा केला जात आहे. पण पुण्यात सध्या फक्त ३९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कदाचित त्यामध्ये पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड यांचीही आकडेवारी असावी. पण पुण्यात पॉझिटिव्हिटी, मृत्यूदर, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी आली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“पुणे शहरात परिस्थिती चांगली असून रुग्णसंख्येचा दर कमी होत आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी चांगलं वातावरण आहे. यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“गेल्या एक महिन्यापासून लॉकडाउनसारखी परिस्थिती असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असून डिस्चार्ज वाढले आहेत. यंत्रणा सुरळीत आहेत. यापेक्षा अधिक लॉक़ाउन काय असणार आहे. कडक लॉकडाउनची गरज नाही, कारण परिस्थिती नियंत्रणात आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 12:27 pm

Web Title: pune mayor murlidhar mohol on mumbai high court coronavirus lockdown sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : “…पण याला लाईट लागणार?”; अजित पवारांना पडला प्रश्न
2 पुण्यात लॉकडाउन लावण्यासंबंधी आज निर्णय?; अजित पवारांच्या बैठकीकडे लक्ष
3 मोसमी  पाऊस १ जूनला केरळमध्ये!
Just Now!
X