24 November 2020

News Flash

मेट्रोच्या कामाला गती द्या

मेट्रोच्या कामाला आणखी गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी गुरुवारी केली. 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत शिवाजीनगर धान्य गोदाम, कृषी महाविद्यालयाचे मैदान, रेंजहिल्स तसेच खडकी स्टेशन परिसरातील कामांची गुरुवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाहणी केली. मेट्रोच्या कामाला आणखी गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू आहेत. त्या अंतर्गत शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामाजवळ मेट्रोचे स्थानक प्रस्तावित आहे, तर कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मेट्रोचा डेपो प्रस्तावित आहे. शिवाजीनगर येथे धान्याची २१ गोदामे असून तेथे १५ इमारती आहेत. या १५ पैकी हवेली सेतू केंद्राच्या जागेसह चार गोदामांचे महामेट्रोकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. तसेच सेतू केंद्राची जागा रिकामी करण्यात आली असून सेतू केंद्र लवकरच एसटीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे,  तर पुणे जिल्हा नागरी सुविधा केंद्र वैकुंठभाई मेहता महाविद्यालयाशेजारील जागेत स्थलांतरित होणार आहे. अन्य दोन इमारतींचा ताबाही लवकरच मेट्रोकडे देण्यात येणार आहे. उर्वरित इमारतींमध्ये पुरवठा विभाग, अन्न धान्य वितरण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचे साहित्य, अन्न धान्य असल्याने या इमारती अद्याप मेट्रोकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. या इमारती महामेट्रोला हस्तांतरित करण्यासंदर्भात कोणत्या अडचणी आहेत, याची पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. गोदामांसाठी एकत्रित जागा न मिळाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी विभागानुसार ही गोदामे स्थलांतरित करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी या वेळी केली. कृषी महाविद्यालयाच्या जागेवरील प्रस्तावित डेपो, मेट्रोच्या उन्नत आणि भुयारी मार्गाची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच खडकी स्टेशन आणि रेंजहिल्स येथील संरक्षण विभागाच्या जागेची पाहणी बापट यांनी केली.

झोपडय़ांचे पुनर्वसन होणार

मेट्रोच्या कामामुळे कामगार पुतळा येथील २०० झोपडय़ा बाधित होणार आहेत. तसेच राजीव गांधीनगर येथील ३६ झोपडय़ा बाधित होणार आहेत. या झोपडय़ांचे पुनर्वसन करण्यात येणार असून मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या ४०० झाडांचे पुनरेपण महामेट्रोकडून करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 4:35 am

Web Title: pune metro work girish bapat
Next Stories
1 विक्रमी उत्पादनामुळे साखरेचा प्रश्न गंभीर
2 ‘आरटीओ’तून रोकड हद्दपार!
3 स्वस्त धान्य दुकानांमध्ये एईपीडीएस व्यवस्था
Just Now!
X