26 November 2020

News Flash

खळबळजनक! मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

साताऱ्यातील व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार

मनसे उमेदवार रुपाली पाटील. (संग्रहित छायाचित्र)

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रुपाली पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली असून, धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. याप्रकरणी पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच मतदारसंघात प्रचार रंगू लागला आहे. पुण्यातही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, या जागेच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सातारा येथील लबाडे आडनाव असलेल्या व्यक्तीनं पाटील यांना धमकी दिली आहे. आरोपींनं फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर रूपाली पाटील यांनी पोलिसांत धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या मतदारसंघातून यापुर्वी दोन वेळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाचे संग्रामसिंह देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. तर याच दरम्यान पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना सातारा येथून लबाडे या व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या धमकीच्या फोनमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 4:16 pm

Web Title: pune mlc election mns candidate rupali patil mlc election threat bmh 90 svk 88
Next Stories
1 “मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”
2 … त्यावेळी अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती : चंद्रकांत पाटील
3 चंद्रकांत पाटील म्हणतात, “सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही…”
Just Now!
X