29 January 2020

News Flash

पुण्यात सोमवारी ‘लोकसत्ता साखर परिषद’

‘लोकसत्ता’तर्फे सोमवार, २० जानेवारीला पुण्यात साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या शेतीकारणात आणि अर्थकारणात महत्त्वाच्या असलेल्या साखर उद्योगासमोरील आव्हानांचा विचारविमर्श करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे सोमवार, २० जानेवारीला पुण्यात साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार  हे या परिषदेत खास उपस्थित राहणार आहेत. राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापैकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हे परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

प्रत्येक वर्षी साखर उद्योग वेगवेगळ्या संकटांनी घेरला जातो. कधी दुष्काळामुळे उसाच्या पिकावर विपरीत परिणाम होतो, तर कधी अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाने बाजारपेठेशी निगडित समस्या उभ्या राहतात. अशा सगळ्याच समस्यांचा आढावा घेऊन, त्यावर काही ठोस उपाय शोधण्याच्या हेतूने या साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  संख्येने असल्यामुळे विविध पातळ्यांवर समस्या उभ्या राहताना दिसतात. सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीबरोबरच जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करताना होणारी दमछाक ही साखर कारखान्यांसमोरील मोठी अडचण ठरत आहे. यंदाच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली

  • टायटल पार्टनर : एस.एस. इंजिनियर्स
  • असोसिएट पाटर्नर : रावेतकर व मारुती सुझुकी – सुपर कॅरी

’पॉवर्ड बाय : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ जिल्हा कोल्हापूर, इंडियाना सुक्रो—टेक (पुणे) प्रा. लि.,  महाराष्ट्र राज्य साखर संघ लि., सुवीरॉन इक्विपमेंट्स प्रा. लि.,  भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., एक्सेल इंजिनिअरींग

बँकिंग पार्टनर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

First Published on January 15, 2020 2:05 am

Web Title: pune monday loksatta sakhar parishad akp 94
Next Stories
1 मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम
2 फ्लॅटधारकाची सुरक्षा रक्षकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
3 माणुसकी गोठली! पुण्यात गारठवणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक
Just Now!
X