पिंपरी-चिंचवडमध्ये महा-मेट्रोचं काम जलदगतीने सुरू असून, हे काम सुरू असताना खबरदारी घेण्याची गरज असल्याची बाब अधोरेखित करणारी घटना रविवारी (१ ऑगस्ट) घडली. शहरातील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यासमोर मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे. काम जलदगतीने सुरू असून, सोमवारी काम सुरू असताना सिमेंटच्या विटांचा काही भाग ढासळून थेट दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला. सुदैवानं या घटनेत जीवितहानी वा जखमी झालेलं नाही. मात्र, या घटनेमुळे २०१९ मध्ये झालेल्या क्रेन दुर्घटनेची आठवणी नागरिकांना झाली.

पिंपरी-चिंचवडसह पुण्यात महा-मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. जानेवारी २०१९ मध्ये महा-मेट्रोचं काम सुरू असताना नाशिक फाटा येथे अवाढव्य क्रेन कोसळलं होतं. त्यातही सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झाली नव्हती. रविवारीही एक दुर्घटना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर घडली. येथे मेट्रो स्थानक उभारण्याचं काम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना सिमेंटच्या काही विटा ढासळून थेट जुना पुणे-मुंबई महामार्गावर कोसळल्या.

सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहन ये-जा असते. मात्र, जेव्हा विटा कोसळल्या त्यावेळी वाहन जात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहन ये-जा असते. मात्र, जेव्हा विटा कोसळल्या त्यावेळी वाहन जात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी महा-मेट्रोचं जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, “नेहमी तिथे जाळी असते. परंतु, ती नेमकी काढत असताना काही विटा ढासळल्या. यात कोणीही जखमी नाही. मात्र, संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार आहोत, याची सेफ्टी डिपार्टमेंट चौकशी करणार आहे”, असं ते म्हणाले आहेत.