मुंबई-पुणे महामार्गावर औंढे गावाजवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाला अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झाले असून, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका बालकाचा समावेश आहे. हा अपघात आज दुपारी बाराच्या सुमारास झाला.

सानिया पराडकर (१२) या चिमुकलीसह अन्य दोघांचा मृत्यू झाला असून, प्रियंका, कुणाल, रेश्मा, कृतिका हिंदळकर हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
mumbai pune expressway marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने

ही चारचाकी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली झायलो ही प्रवासी मोटार (एमएच 0४ जीडी ४३८) भरधाव वेगात जात असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या बॅरिकेटला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सर्व जखमींना खंडाळा महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे आर्यन देवदूत पथक व आयआरबीचे कर्मचारी यांनी गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले आहे.