क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वतंत्र पथकांची नियुक्ती

पुणे : करोना विषाणूचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण ज्या भागात आहेत,अशा अतिधोकादायक परिसरातील (हाय रिस्क एरिया)  प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून स्वतंत्र पथकांची नियुक्ती के ली असून एकू ण २२५ पथकांकडून हे सर्वेक्षण के ले जाणार आहे.

करोना विषाणूच्या संसर्गाचे संकट गडद झाले आहे. शहराच्या काही भागात एकाच ठिकाणी सर्वाधिक रुग्ण शासकीय यंत्रणांना आढळून आले आहेत. या परिस्थितीमध्ये कोंढवा, गुलटेकडी, महर्षीनगर, नानापेठ, भवानी पेठ, मंगळवार पेठ, टिंबर मार्के ट, कासेवाडी, डायस प्लॉट, पुणे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पर्यंतच्या परिसरात टाळेबंदी करण्यात आली असून या भागात पोलिसांकडून कडक निर्बंधही (कर्फ्यू) लादण्यात आले आहेत. या भागात सामान्य नागरिाकं ना प्रवास करण्यास आणि घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

मात्र अद्यापही या भागात संशयित रुग्ण असण्याची शक्यता असल्यामुळे महापालिके ने या अतिधोकादायक भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र पद्धतीने २२५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका शाळांतील शिक्षक आणि आशा सेविका, परिचारिका, समहूसंघटिका यांचा समावेश करण्यात आला आहे. या अती धोकादायक परिसरात जाऊन या पथकाकडून आजाराची माहिती घेतली जाणार आहे. संशयित रुग्णांची माहितीही संकलित के ली जाणार आहे. सर्दी, खोकला, पडसे, ताप, कफ अशी लक्षणे आढळणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार के ले जाणार आहेत.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३९, कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ४९, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी ४०, वानवडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १४, कोंढव-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीसाठी २१, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून २५ पथके  करण्यात आली आहेत. तसेच या व्यतिरिक्त आसपासच्या भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी २१ पथके  करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, भारतीय जैन संघटनेकडून महापालिके ला ११ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत रुग्णवाहिके च्या माध्यमातून शहराच्या काही भागात जाऊन डॉक्टर आणि एका पथकाकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. भवानी पेठ भागासाठी दोन, कसबा विश्राबागवाडा भागासाठी दोन, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी दोन, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालसाठी एक, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालाअंतर्गत एक, तर धनकवडी, कोंढवा-येवलेवाडी आणि वानवडी-रामटेकडी या क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी एक-एक रुग्णवाहिका आणि तपासणीसाठी आवश्यक मनुष्यबळ देण्याचे नियोजन महापालिके कडून करण्यात आले आहे. या रुग्णवाहिके तील पथकाकडून दर दोन तासाला अहवाल सादर के ला जाणार असून तो स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविला जाणार आहे. त्यानुसार रुग्णांची संख्या, संशयित रुग्ण, तपासणी के लेल्या नागरिकांची माहिती आणि संख्या असा तपशील स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाकडून संकलित के ला जाणार आहे, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.