ऑक्सिजनची उपलब्धता, पुरवठा आणि नियंत्रण या सगळ्यासाठी उपयुक्त अशा दोन अॅप्सची निर्मिती पुणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या अॅप्सचं लोकार्पण आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

करोना प्रादुर्भावाच्या काळात रुग्णांना प्राणवायूच्या पुरवठ्याची गरज लागते. मधल्या काही काळात ज्यावेळी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती, त्यावेळी याच ऑक्सिजनची कमतरता देशभरात भासू लागली होती. ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशी नसल्याने काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले होते. पुणे जिल्ह्यातली परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. तिथेही अशा पद्धतीच्या समस्या जाणवल्या होत्या.

आणखी वाचा- My Pune Safe: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम

पण आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने मागणीही मंदावली आहे. मागचे अनुभव लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन हे दोन अॅप्स तयार करण्यात आले आहेत

ऑक्सिचेन ॲप

ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि मागणीचा, पुरवठ्याचा अंदाज घेण्यासाठी ह्या अॅपचा उपयोग होणार आहे. या ॲपमध्ये जिल्हयातील ऑक्सिजन उत्पादक, रिफिलर्स,वितरक आणि रूग्णालय यांचा समावेश आहे.

ऑक्सिवीन ॲप

या अॅपमध्ये एक संग्रहित डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनवर आधारित डेटा तीन रंगाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केला आहे