पहिल्या टप्प्यात ११८ जागा विक्रीचा प्रस्ताव; ३०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित

पुणे : करोना संकटामुळे उत्पन्न मिळण्याची संदिग्धता, उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, वाढता खर्च या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात अडकून तिजोरी रिकामी झालेल्या महापालिके ने उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता विक्रीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ११८ जागा विक्रीचे धोरण महापालिके च्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून तयार करण्यात आले आहे. जागा विक्रीतून तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. जागांची विक्री होणार असली तरी कोणत्या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा, हे महापालिका निश्चित करणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) मिळणाऱ्या अनुदानाबाबतची अनिश्चितता, करोना संकटामुळे ठप्प झालेली बांधकामे, घटलेले बांधकाम परवानगी शुल्क आणि मिळकतकराचे घटलेले उत्पन्न या परिस्थितीमुळे महापालिके पुढे चालू आर्थिक वर्षांत महासंकट निर्माण झाले आहे. वर्षअखेरीस अपेक्षित उत्पन्न जमा होण्याची शक्यताच धूसर असल्यामुळे प्रकल्पांची कामेही थांबविण्याची वेळ महापालिके वर येण्याची शक्यता आहे. उत्पन्नावर मर्यादा आल्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवनवीन स्रोतांची चाचपाणी सुरू झाली असून त्या अंतर्गत मालमत्ता विक्री करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. त्यानुसार महापालिके च्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने पहिल्या टप्प्यात ११८ जागा विक्री करण्याचा प्रस्ताव तयार के ला आहे.

बांधकाम विकास विभागाकडून त्याबाबतचे धोरण तयार होणार आहे. धोरणाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर लिलाव प्रक्रियेद्वारे जागांची विक्री होणार आहे.

मैदाने, शाळांच्या इमारती, उद्याने, वाहनतळाच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. महापालिके च्या मोकळ्या जागांवर सातत्याने अतिक्रमणे होतात. ती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. सुरक्षा रक्षकांचा खर्च, देखभाल दुरुस्तीवरही खर्च करावा लागतो. त्यामुळे त्याचा वापर मंगल कार्यालये, लहान-मोठे कार्यक्रम करण्यासाठी के ल्यास उत्पन्न वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सदनिका, गाळ्यांच्या विक्रीचेही संकेत

सध्या महापालिके च्या मालकीच्या १० हजार सदनिका आहेत. त्यापैकी ३ हजार सदनिका महापालिके च्या ताब्यात आहेत. त्यातील १ हजार ५०० लहान-मोठय़ा सदनिका, गाळ्यांची विक्री दुसऱ्या टप्प्यात करण्याचे संके त सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याशिवाय मोकळ्या जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी के ला जाणार आहे.

महापालिके च्या जागा विक्रींचा प्रस्ताव मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. बांधकाम विभागाकडून त्याबाबतचे धोरण तयार करण्यात येईल. ते स्थायी समिती, आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर स्थायी समिती, मुख्य सभेच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबाजवणी होईल.

– राजेंद्र मुठे, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उपायुक्त