News Flash

उमेदवारीसाठी दिलेल्या रकमेसाठी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

भाजपकडून काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली.

Pune Bjp Party Worker : पुण्यातील भाजप कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत घालताना पालकमंत्री गिरीश बापट.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आज (सोमवार) शहर भाजप कार्यालयाबाहेर प्रभाग क्रमांक १२, १३ आणि १४ मधील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जासाठी दिलेली रक्कम परत करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट हे कार्यालयामध्ये होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर झालेली नाही हे यातून स्पष्ट होत आहे.

यंदाच्या पुणे महापालिकाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय भाजपमध्येच आधिक घडामोडी घडल्या. या पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे निष्ठावंताना मोठ्याप्रमाणावर डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावललेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर धरणे धरत शहराध्यक्षांच्या फ्लेक्सवर शाई फेकून निषेध नोंदवला होता. त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत पक्षाच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले. पक्षाच्या आदेशानुसार या सर्वांनी काम केले. मात्र, आज मतदानाला काही तास शिल्लक असताना पक्ष कार्यालयाबाहेर प्रभाग क्रमांक १२, १३ आणि १४ मधील नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला.
प्रभाग क्रमांक १३ मधील ओंकार कदम म्हणाले की, या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत आम्हाला कामाला सुरुवात करा, असे सांगण्यात आले. घरोघरी जाऊन आम्ही प्रचार देखील सुरू केला. यासाठी मोठा खर्च केला. उमेदवारी अर्जासाठी ११ हजार रुपये भरण्यात आले. आमची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे किमान अर्जाचे ११ हजार रुपये द्यावे, अशी मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पालकमंत्री बापट यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 3:46 pm

Web Title: pune municipal corporation election 2017 bjp party workers agitation against city president minister girish bapat
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये मतांचा खुला ‘बाजार’
2 भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून हाणामारी
3 ‘गानसरस्वती’च्या मैफलीने रसिक तृप्त
Just Now!
X