21 September 2020

News Flash

महापालिका खरेदी करणार आणखी १ लाख अँटीजेन किट

स्थायी समितीची मान्यता

स्थायी समितीची मान्यता

पुणे : करोना संसर्गाचे तातडीने निदान होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी नव्याने एक लाख किट महापालिके कडून खरेदी के ली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

शहरातील करोनाबाधित रुग्णांचे तातडीने निदान व्हावे, यासाठी महापालिके कडून शहराच्या विविध भागात अँटीजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिके ने जून महिन्यात १ लाख अँटीजेन किट खरेदीस मान्यता दिली होती. या चाचण्यांचा अहवाल ३० मिनिटांत येत असून करोनाबाधित रुग्णांचे तातडीने निदान करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे नव्याने १ लाख किट खरेदीचा प्रस्ताव महापालिके च्या आरोग्य विभागाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाल मंगळवारी एकमताने मान्यता देण्यात आली.

प्रती किट ४५९.२० रुपये या दराने एकू ण ४ कोटी ५९ लाख २० हजार रुपयांची खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. एसडी बायसेन्सॉर हेल्थके अर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ही किट खरेदी के ली जाणार आहेत.

फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या तसेच हृदयविकार, फफ्फु स, यकृत, मृत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब विकार असलेल्या व्यक्तीवर उपचार करताना अँटीजेन चाचणी करण्यास राज्य शासानाने मान्यता दिली आहे. शहरात करोना संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे अँटीजेन चाचण्यांद्वारे झपाटय़ाने निदान के ले जात आहे. सध्या हा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे नव्याने खरेदी करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:42 am

Web Title: pune municipal corporation will buy another 1 lakh antigen kits zws 70
Next Stories
1 सणासुदीत गूळ महागला
2 पुण्यात करोनामुळे २२ तर पिंपरीत १४ जणांचा मृत्यू
3 चोरी झाली ५० लाखांची, बायकोच्या धाकाने फिर्याद केली ५ लाखांची ! पुण्यातल्या नवरोबाची अजब कहाणी
Just Now!
X