News Flash

पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन!

सर्व परिस्थितीचा विचार करून दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा देखील दिला आहे.

पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात आज(सोमवार) पुण्यातील अलका चौकातील पेट्रोल पंपासमोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ”बेचारी जनता करे पुकार लुट रही है, मोदी सरकार….”, ”करोनाने वाचलो, पण महागाईने मेलो..”, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, केंद्रात भाजपाची सत्ता येऊन जवळपास सात वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. सात वर्षांपुर्वी ७० रुपये लिटर दराने मिळणारे पेट्रोल, आज १०० रुपयांना मिळत आहे. या दरवाढीचा परिणाम सर्व स्तरावर होतो आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले असताना. आता खतांचे दर देखील वाढत आहे. या सर्व दरवाढीमधून शेतात राबवणार शेतकरी ते शहरातील नागरीक सुटला नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज आंदोलन करीत आहोत.

तसेच, केंद्र सरकारने किमान करोना काळात अनेक नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. बाजारपेठ ठप्प आहेत, या सर्व बाजूंचा विचार करून, ही दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा आम्ही पुण्यात तीव्र आंदोलन उभा करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 2:23 pm

Web Title: pune nationalist congress partys agitation against petrol diesel price hike msr 87
Next Stories
1 कोरोना काळातील कामांसाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताही नेता फिरला नसेल : चंद्रकांत पाटील
2 कठोर निर्बंधात गुंडाच्या अंत्यविधीसाठी गर्दी
3 पुणे परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम
Just Now!
X