30 November 2020

News Flash

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या दोन अलिशान कार जप्त

आर्थिक गुन्हे शाखेचे कारवाई; आणखी मालमत्ता जप्त करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला

संग्रहीत

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांविरोधात १३५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आमदार अनिल भोसले हे अटकेत असून या प्रकरणाच्या तपासला आता गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता आर्थिक गुन्हे शाखे मार्फत अनिल भोसले यांच्या दोन कार तीन दिवसांपूर्वी जप्त केल्या आहेत. तर आता भोसले यांची आणखी मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली. या कारवाईमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 4:12 pm

Web Title: pune ncp mla anil bhosales cars seized msr 87svk 88
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणी चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून उपयोग नाही, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज – सुप्रिया सुळे
2 विक्रीच्या धोरणाअभावी दुर्मीळ ग्रंथसंपदा लालफितीत
3 स्वच्छतागृहांचा व्यवसायासाठी वापर
Just Now!
X